प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग १)
प्राथमिक शाळेत विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेत मुलांना अभ्यासाबाबत ज्या चांगल्या किंवा वाईट सवयी लागतात त्यांचा त्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो. म्हणून प्राथमिक शिक्षणात गणिताच्या अध्यापन आणि अध्ययन पद्धतींना आत्यंतिक महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविक आहे. संख्याबाबतचे मूलभूत संबोध मुलांना अवगत न झाल्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या प्राथमिक क्रिया करताना मुलांच्या हातून सतत चुका …